वळके गावात ग्रामपंचायतीची स्वतंत्र सुसज्ज इमारत असून सार्वजनिक सभागृह आहे, सार्वजनिक सभागृहाचे नाव स्व. बाळासाहेब ठाकरे सभागृह आहे.
ग्रामपंचायत कार्यालयात स्वतंत्र कक्ष असून, त्या ठिकाणी बैठक व्यवस्था, पाणी सुविधा आणि शौचालय सुविधा आहे. आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून सर्व प्रकारचे दाखले आणि इतर सर्व डिजिटल सेवा तत्परतेने दिल्या जातात.
नियमित तक्रारींचे निवारण करण्यासठी तक्रार पेटी उपलब्ध आहे.
ग्रामपंचायत ची स्वतंत्र वेबसाईट आहे. www.gpvalke.com सदरील वेबसाईटवर सेवा सुविधा, भौगोलिक सामाजिक संसृतिक माहिती देण्यात आलेली आहे. सर्व लेखे अपलोड केलेले आहेत. गावातील सुरक्षेसाठी गावातील परिसर, मुख्य रस्ता, शाळा इत्यादी ठिकाणी CCTV बसवण्यात आलेले आहेत. ग्रामपंचायतचे सन २०२३-२०२४ पर्यंत लेखा परीक्षण करून घेण्यात आलेले आहे. तसेच, ग्रामपंचायत स्थापणेपासूनचे सर रेकोर्द्स वर्गीकृत करण्यात आलेले आहेत. अभिलेख वर्गीकरण करण्यात आलेले आहे. त्यामुळे कोणत्याही वर्षाचे अभिलेख सहज उपलब्ध होतात.
ग्रामपंचायत सर्व मुख्य रस्ते डांबरीकरण करण्यात आलेले आहे. रस्ते व पायवाटा यांची दुरुस्ती तसेच साफसफाई केली जाते. ग्रामपंचायत कार्यालयात एक पूर्ण प्राथमिक शाळा व दोन अंगणवाड्या आहेत. शाळा बाह्य मुले नाहीत. शाळा व सर्व अंगणवाड्या मधील वीज पाणी, स्वतंत्र शौचालय, डिजिटल रूम. क्रीडा साहित्य, शैक्षणिक साहित्य, क्रीडांगण, रेनwater हर्वेष्टिंग सिस्टीम, शोष खड्डे, मुलांना बसण्यासाठी बेंच उपलब्ध आहेत. शाळा व अंगणवाड्या मध्ये परसबाग आहे. तसेच, बोलक्या भिंतीनी रंगविण्यात आलेल्या आहेत. शाळेसाठी सांस्कृतिक कार्याक्रम्साठी माजी विद्यार्थी संघाने रंगमंच बांधून दिलेला आहे. शाळेला स्वतंत्र किचन शेड आहे. ग्रामपंचायत शाळा व अंगणवाडी परिसर सुशोभित करण्यात आलेला असून, बाग बगीचा करण्यात आलेला आहे.
ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात २ पाणी पुरवठा योजना असून सर्व घरांना वैयक्तिक नळ कनेक्शन ने पाणी पुरवठा करण्यात आलेला आहे. ७०% कुटुंबाना मीटर बस्नव्ण्यात आलेले आहेत. सध्या वळके मराठवाडी पाणी पुरवठा योजना सावित्री महिला ग्राम्संघ चालवत आहे.
वळके बौद्धवाडी ते स्मशानभूमी पर्यंत स्ट्रीट लाईट बसवण्यात आलेले आहेत. मुख्य स्मशानभूमी येथे पाणी व लाईट व्यवस्था आहे. त्या ठिकाणी पक्की स्मशान शेड असून श्रद्धांजली कक्ष उभारण्यात आलेला आहे. सर्व स्मशानभूमीला संरक्षक भिंत आहे.
आरोग्यसेवेसाठी जवळच कापडगाव येथे उपकेंद्र आणि खानु येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध असून येथे नियमित आरोग्य तपासण्या, औषधोपचार आणि प्रसूतीपूर्व तपासण्या केल्या जातात. तसेच, गावात एक खाजगी दवाखाना आहे.
गावात सार्वजनिक सुविधा म्हणून पाणपोई, सार्वजनिक शौचालये आणि ग्रामस्थांसाठी विश्रांतीसाठी बाकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या सुविधा नियमितपणे देखभाल केल्या जातात.
गावामध्ये कचरा संकलन शेड ची उभारणी केली असून ज्याद्वारे कचरा संकलनाचे काम केले जाते.
गावातील मुख्य रस्ते सिमेंट काँक्रीटचे असून अंतर्गत वाड्यांमध्ये मुरमाड रस्ते आहेत. रस्त्यांवर स्ट्रीटलाईट बसविण्यात आले असून रात्रीच्या वेळेस सुरक्षित आणि प्रकाशमान वातावरण निर्माण होते.
शैक्षणिक सुविधांच्या दृष्टीने वळके गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कार्यरत आहे. येथे मुलांना प्राथमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. त्याचबरोबर अंगणवाडी केंद्र देखील आहे, जिथे बालकांना पोषण, आरोग्यसेवा आणि पूर्वप्राथमिक शिक्षण दिले जाते.
महिलांसाठी एकूण १७ स्वयं-साहाय्य गट कार्यरत असून हे गट महिलांच्या बचतीस, लघुउद्योगांना आणि आर्थिक सक्षमीकरणास प्रोत्साहन देतात. या मध्ये सुमारे २०० पेक्षा जास्त महिलांचा समावेश आहे.
गावात बसथांबे उपलब्ध आहेत आणि गाव रत्नागिरी व इतर परिसराशी चांगल्या संपर्कात आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा नियमित चालते.
ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिरे वेळोवेळी आयोजित केली जातात. त्याचप्रमाणे दर महिन्याला लसीकरण मोहिमा राबविण्यात येतात, ज्यामध्ये बालक, गर्भवती महिला आणि वयोवृद्धांचा समावेश असतो.








