ग्रामपंचायत वळके यांच्या वतीने स्वच्छता अभियानाला चालना देण्यासाठी गावातील नागरिकांना डस्टबिन वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवण्याची सवय नागरिकांमध्ये रुजवणे हा आहे. ग्रामपंचायतीच्या या प्रयत्नामुळे गाव अधिक स्वच्छ व निरोगी ठेवण्यास मदत होणार असून नागरिकांकडूनही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.











