ग्रामपंचायत वळके यांच्या पुढाकाराने जनजागृतीसाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले असून यात शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारी यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर संदेश देत विद्यार्थ्यांनी गावामध्ये जनजागृती केली. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत झाली असून ग्रामपंचायतीच्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे.











