आदिशक्ती अभियान अंतर्गत तालुकास्तरीय समितीने ग्रामपंचायत वळके येथे भेट देऊन विविध उपक्रमांचा आढावा घेतला. या भेटीदरम्यान ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या महिला सक्षमीकरण, स्वच्छता व जनजागृती कार्यक्रमांची माहिती घेण्यात आली तसेच पुढील कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या भेटीमुळे ग्रामपंचायतीच्या कार्याला अधिक बळ मिळून स्थानिक पातळीवर विकास उपक्रमांना गती मिळणार आहे.


















